Dehuroad : चोरट्याने सोसायटीमधून दुचाकीसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळवला

एमपीसी न्यूज – तारेचे कुंपन तोडून चोरट्याने सोसायटीच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन तसेच दुचाकी चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी (दि. 9) पहाटे तीन ते पावणेचारच्या दरम्यान रावेत प्राधिकरण येथे घडला.

जितेंद्र भेंडा (वय 33, रा. सिल्वर पार्क, सेक्टर 29, रावेत प्राधिकरण) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी फिर्यादी यांच्या सोसायटीच्या तारेचे कुंपन तोडून सोसायटीत प्रवेश केला. तसेच फिर्यादी यांच्या फ्लॅटचे लॉक तोडून कपाटातील साहित्य विस्कटले. तसेच त्यांच्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली 25 हजार रुपये किमतीची जीजे 12 / एएस 9777 ही दुचाकी व सोसायटीच्या ऑफिसमधील 20 हजारांची डीव्हीआर मशीन असा एकूण 45 हजारांचा माल चोरट्याने चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.