Dehuroad : कोल्ड्रींक्समधून गुंगीचे औषधे देऊन महिलेवर बलात्कार; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गुंगीचे औषध मिसळून कोल्ड्रींक्स पिण्यास दिले. त्यानंतर महिलेच्या पर्समधून ओळखपत्र काढून हॉटेलवर नेले. तिथे तिला पुन्हा तेच पेय पिण्यास दिले. महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. ही घटना औंध येथे घडली.

याप्रकरणी 34 वर्षीय पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ठाकुर उर्फ फौजी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ठाकुर याने फिर्यादी यांना फोन करून आकुर्डी रेल्वे स्टेशनवर बोलावले. त्यानंतर शिवाजी नगर येथे बोलावून वाहनात बसण्यास सांगितले. वाहनात बसल्यावर फिर्यादीला गुंगीचे औषध मिसळलले कोल्ड्रींक्स प्यायला दिले.

महिलेला थोडीशी गुंगी आल्यानंतर हॉटेलमध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेले ओळखपत्र तिच्या पर्समधून काढून घेतले. औंध येथील हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवण करताना पुन्हा तेच कोल्डड्रिंक्स दिले. त्यानंतर महिलेला चक्कर आल्यावर तिला रुममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

शुद्धीत आल्यावर हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आला. त्यावेळी याबद्दल कुणाला काही सांगितले तर तुझ्या मुलांचे काय होईल? अशी धमकी आरोपीने पिडीत महिलेला दिली. याप्रकरणी पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.