BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : कारच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात; सोलापूर विभागाचे पोलीस उपायुक्त जखमी

एमपीसी न्यूज – कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कारचे स्टेअरिंग वळू शकले नाही. त्यामुळे कारचा अपघात झाला. या अपघातात सोलापूर शहर विभागाचे पोलीस उपायुक्त जखमी झाले. हा अपघात आज (मंगळवारी) सकाळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झाला.

सोलापूर शहर विभागाचे पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड हे या अपघातात जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या कारचा चालक ही घटनेत जखमी झाला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड त्यांच्या कामानिमित्त कारने मुंबईला गेले होते. ते आज पहाटे मुंबईहून पुण्याकडे येत होते. ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आले असता त्यांच्या कारची स्टेअरिंग जाम झाली. स्टेरिंग वळू शकली नाही. यामुळे कार रस्त्यातील डिव्हायडरला धडकली. यात कारच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले.

पोलिस उपायुक्त मधुकर गायकवाड जखमी झाले. तसेच त्यांच्या कारचालकही या अपघातात जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलीस उपायुक्त गायकवाड आणि त्यांच्या चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like