Dehuroad : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – कंटेनर आणि दुचाकीचा झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर, एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर देहूरोड येथे झाला आहे.

सौदागर दशरथ लोंढे (वय 27), ऐश मोहम्मद खान (वय 23, दोघे रा. मोरेवस्ती, चिखली) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर, ज्ञानेश्वर दत्तू कांबळे (वय 26) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

देहुरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील भक्ती शक्ती चौकाच्या दिशेने शुक्रवारी रात्री उशिरा दुचाकी जात होती. त्याचवेळी अचानक समोरुन आलेला कंटेनर वळताना दिसला. मात्र दुचाकीवरील नियंत्रण सुटून थेट चाकाखाली गेली. यात दोघांच्या अंगावरून कंटेनर गेला. त्या दोघांचा मृत्यू झाला. तर, एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, कंटेनर चालक हा फरार झाला आहे. त्याचा देहूरोड पोलीस शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.