Dehuroad : मोक्काच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

Accused arrested for absconding for a year in Mocca crime : साथीदारांसोबत मिळून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिला आहे.

एमपीसी न्यूज – खुनाचा प्रयत्न आणि मोक्काच्या गुन्ह्यात मागील एक वर्षभरापासून फरार असलेला आरोपी देहूरोड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

सुरेश मुन्ना अवचिते (रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

खुनाचा प्रयत्न आणि मोक्काच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेला आरोपी सुरेश अवचिते गांधीनगर येथे येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सचिन शेजाळ यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी सुरेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा केल्याचे सांगितले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रसाद गज्जेवार, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, सचिन शेजाळ, विजय गेंगजे, सुमित मोरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.