Dehuroad : तरुणीचे अपहरण करून बलात्कार आणि मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक

Accused of kidnapping, raping and beating a young woman arrested :ही घटना बुधवारी (दि. 22) सकाळी साडेसह वाजता मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड परिसरात घडली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

एमपीसी न्यूज – मेडिकलमध्ये औषधे आणण्यासाठी जात असलेल्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला मारहाण करून मारहाण करताना मोबईल फोनमध्ये व्हिडीओ काढला. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 22) सकाळी साडेसह वाजता मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड परिसरात घडली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

साजन मन्नू मेहरा (वय 27), अनिकेत रणवीर झिंजोड (वय 22) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रोहन राजेंद्र टाक (वय 18) हा आरोपी अद्याप फरार आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी बुधवारी सकाळी साडेसहा वाजता औषधे आणण्यासाठी मेडिकलमध्ये जात होती.

त्यावेळी आरोपींनी तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून नेले. पुणे-मुंबई महामार्गावर नेऊन तिच्यावर आरोपी साजन याने लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर आरोपींनी तरुणीला दुचाकीवरून टीसी कॉलनी येथे आणून आरोपी साजन आणि अनिकेत यांनी पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच मारहाण करताना आरोपी रोहन याला मोबईलमध्ये शूटिंग करण्यास सांगितले. याबाबत तिघांवर भारतीय दंड विधान कलम 376 (1), 366, 324, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना रामवाडी येरवडा येथून अटक करण्यात आली आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रसाद गज्जेवार, पोलीस उप निरीक्षक योगेश रामेकार, पोलीस कर्मचारी गणेश जगदाळे, प्रशांत पवार, सचिन शेजाळ, सुमित मोरे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.