_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

DehuRoad : पत्नीचा खून करून फरार झालेला आरोपी गुन्हे शाखा युनिट पाचच्या जाळ्यात

Accused of murdering wife absconding in Crime Branch Unit 5 : आरोपी करिमशा आत्महत्या करणार होता. त्यासाठी त्यांने रस्सी खरेदी केली होती व आत्महत्या करत असल्याबाबत चिठ्ठी लिहिली होती.

एमपीसी न्यूज – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात लोखंडी पट्टीने वार करत खून करून फरार झालेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने आज (दि.7) शिक्रापूर येथून अटक केली.

करीमशा अहमद शेख (वय. 64, मुळगाव श्रीरामपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी करिमशाने रविवारी (दि.5) पत्नी आबेदा करिमशा शेख ( वय. 45, रा. वाघजाई सोसायटी, साईनगर, ता. मावळ, जि.पुणे ) हिचा खून केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता.

याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीचे मुळगाव श्रीरामपूर येथील असल्याने त्या ठिकाणी व पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक ठिकाणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.

_MPC_DIR_MPU_II

करिमशा पुणे नगर रोडवरील रांजणगाव परिसरात पिवळ्या रंगाच्या प्लेजर गाडी वरून फिरत असल्याची माहिती युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक सावंत यांनी पोलीस शिपाई भोसले व पोलीस पथकाला ताबडतोब शिक्रापूर परिसरात रवाना केले. पोलीस नाईक भोसले आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपी करिमशा याला शिक्रापूर परिसरातून अटक केली.

दरम्यान, आरोपीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी आरोपीला देहूरोड पोलीस स्टेशनकडे सूपूर्द करण्यात आले आहे.

आरोपी करणार होता आत्महत्या…

आरोपी करिमशा आत्महत्या करणार होता. त्यासाठी त्यांने रस्सी खरेदी केली होती व आत्महत्या करत असल्याबाबत चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी आरोपीकडून पिवळ्या रंगाची रस्सी व चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.