Dehuroad : स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमावून देण्याच्या बहाण्याने सव्वा लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – स्टॉक मार्केट आणि फॉरेन करन्सीमध्ये पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवून एकाची 1 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.

वसंत देवाजी शिंदे (वय 38, रा. अशोकनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश देसाई (रा. नवसारी, गुजरात) या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यश याने फिर्यादी यांना स्टॉक मार्केट आणि फॉरेन करन्सी मध्ये पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवले. त्यातून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये ‘फोन पे’ आणि बँकेच्या अकाउंटमधून काढून घेऊन त्या पैशांचा अपहार केला.

 

याबाबत फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.