Dehuroad : अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

एमपीसी न्यूज – देहूरोड येथे अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. ही घटना आज (रविवारी) सकाळी अकराच्या सुमारास देहूरोडजवळ मामुर्डी येथे देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर उघडकीस आली.

खून झालेल्या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. तिचे वय अंदाजे 40 वर्ष आहे. महिलेने गुलाबी टीशर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अकराच्या सुमारास देहूरोड पोलिसांना माहिती मिळाली की, देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर मामुर्डी येथे रस्त्याच्या डाव्या बाजूला कच-यामध्ये एक मृतदेह पडला आहे. माहिती मिळताच देहूरोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महिलेच्या डोक्यात मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. तसेच तोंडामध्ये ओढणी घातली आहे.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटली नाही. प्राथमिक अंदाजानुसार खून करून मृतदेह फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.