Dehuroad : अन् त्याने रेल्वे समोर उभा राहण्याचा टास्क पूर्ण केला

एमपीसी न्यूज – ऑनलाइन गेम खेळताना दहावीतील मुलाला ( Dehuroad) रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा टास्क देण्यात आला. त्यामुळे त्याने बुधवारी (दि. 30) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास देहूरोड येथे रेल्वे समोर उभा राहून जीव देत टास्क पूर्ण केला.
देव संजयकुमार (वय 15, रा. देहूरोड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देव संजयकुमार हा इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. लष्कराच्या केंद्रीय विद्यालयात त्याचे शिक्षण सुरू होते. बुधवारी रात्री तो कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडला. तो देहूरोड रेल्वे स्टेशवर आला अन् धावत्या रेल्वेसमोर उभे राहून त्याने जीव दिला.
मुलाच्या मृत्यूबाबत माहिती मिळाल्यावर घरच्यांना धक्काच बसला. मुलाने अचानक असे कृत्य का केले असा त्यांना प्रश्न पडला. त्यांची नजर अचानक त्याच्या मोबाइलवर गेली. त्यांनी मोबाइलवरील टास्कचा मॅसेज वाचला अन् त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. रेल्वे पोलीस तपास करीत ( Dehuroad) आहेत.