Dehuroad : मोठ्या मुलीवर बलात्कारासाठी तुरुंगवास, तात्पुरत्या सुटकेत लहान मुलीवरही बलात्कार!

Dehuroad: Annoying! Imprisonment for rape of older girl, rape of younger girl on temporary release! नात्याला काळीमा फासणाऱ्या नराधम सावत्रबापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – मोठ्या मुलीवर बलात्कार केल्याबाबत एका नराधम सावत्र बापाला शिक्षा झाली. ही शिक्षा भोगत असताना आरोपी बापाची तात्पुरत्या कालावधीसाठी सुटका झाली. घरी आल्यानंतर बापाने पुन्हा लहान मुलीवर बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार देहूरोड परिसरात उघडकीस आला आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुली आणि त्यांची आई हडपसर भागात आरोपी बापासोबत राहत होत्या. मागील तीन वर्षांपूर्वी नराधम बापाने 11 वर्षाच्या (आता वय 14 वर्ष आहे) सावत्र मुलीवर बलात्कार केला. याबाबत पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली आणि त्याची रवानगी कारागृहात केली.

दरम्यान पीडित मुलगी आणि तिच्या लहान बहिणीला घेऊन आई मिळेल ते काम करत एका भागातून दुसऱ्या भागात जाऊन राहू लागली. मागील काही महिने या तिघींनी तळेगाव दाभाडे परिसरात वास्तव्य केले. तेथून या तिघी महिन्याभरापूर्वीच देहूरोड परिसरात राहण्यासाठी आल्या होत्या.

नराधम बाप काही दिवसांपूर्वी कारागृहातून सुटला आहे. तो पुन्हा या कुटुंबाच्या संपर्कात आला. त्याने घरी आल्यावर अकरा वर्षाच्या लहान सावत्र मुलीवर बलात्कार केला. मुलीच्या आईला ही बाब समजली. आईने मुलीला घेऊन दवाखाना गाठला. तेथील डॉक्टरांना घडलेली हकीकत सांगितली. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली आणि याबाबत लगेच देहूरोड पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी नराधम सावत्र बापाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like