Dehuroad : घरी बसलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना गर्दी नियंत्रणाची जबाबदारी सोपवा : रमेश जाधव

एमपीसी न्यूज : लॉकडाउनच्या काळात सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही घरीच बसावे लागले आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारीच सेवेत कार्यरत आहेत. जे कर्मचारी घरी आहेत. त्यांना भाजीमंडई, किराणा दुकाने आदी ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याची तसेच  सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव यांनी केली आहे.

या बाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयातील उपस्थितीवर निर्बंध आले. केवळ अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचायांनाच सेवेत कार्यरत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित बहुतांश सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले.

_MPC_DIR_MPU_II

काही दिवसांपूर्वी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्धा पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता घरी बसून असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणतेही श्रम न करता फुकट पगार मिळणार आहे. त्याऐवजी त्यांना भाजीमंडई, किराणा दुकाने आदी ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याची तसेच सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवावी.

त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होईल. शिवाय सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी होईल, असे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.