BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : बाळा भेगडे यांच्या प्रयत्नामुळे देहूरोड उडडाणपुलाचे काम मार्गी लागले -रघुवीर शेलार

एमपीसी न्यूज- देहूरोडमध्ये जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर 90 कोटींचा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. याकामी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पुढाकार घेतल्याने कमी वेळेत उड्डाणपूल मार्गी लागून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे अशी भावना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी व्यक्त केली आहे.

शेलार म्हणाले, ” देहूरोड स्मशानभूमी, शहरातील अंतर्गत रस्ते, शेलारवाडी ते किन्हई रस्ता, पाण्याची योजना, बांधकाम योजना अशा अनेक योजनांचा आमच्या गावातील अनेक गरिबांना फायदा झाला आहे. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यामाध्यमातून रोड, स्मशानभूमी अशी अनेक विकासकामे वेगाने करण्यात आली ज्यामुळे आमचे गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. ‘भाजपला मत म्हणजेच विकासाला मत’ असून देहूरोड मधील अनेक पायाभूत सुविधाची कामे पुढील काळात मार्गी लागतील, त्याकरिता बाळा भेगडे यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्वजण काम करीत आहेत”

आज, गुरुवारी सकाळी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे देहूरोड आणि शेलारवाडी परिसरात ढोल ताशे आणि फटाक्यांच्या गजरात मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. देहूरोड परिसरात भेगडे यांच्या माध्यमातून अधिक विकासकामे झाल्याने नागरिकांमध्ये बाळा भेगडे यांच्याच चर्चा दिसून आली.

HB_POST_END_FTR-A2

.