Dehuroad : कर्जाचा हप्ता देण्यासाठी बोलावून घेऊन महिलेला मारहाण; एकाला अटक

Beating a woman by calling her to pay a loan installment; One arrested बुधवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आरोपी पिल्ले याने फिर्यादी महिलेला कर्जाच्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी मामुर्डी येथील नारायण गुरु मंदिराजवळ बोलावून घेतले

एमपीसी न्यूज – कर्जाचा हप्ता देण्यासाठी महिलेला बाहेर बोलावून घेतले आणि मारहाण केली. तसेच महिलेचा मोबईल फोन हिसकावून नेला. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) मामुर्डी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सुमित रवी पिल्ले (वय 29, रा. खडकी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आरोपी पिल्ले याने फिर्यादी महिलेला कर्जाच्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी मामुर्डी येथील नारायण गुरु मंदिराजवळ बोलावून घेतले. महिला मंदिराजवळ आल्यानंतर पिल्ले याने पैसे देण्याचे नाटक करून महिलेला खाली पाडून मारहाण केली. तसेच महिलेचा मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेऊन गाडीत बसून निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पिल्ले याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like