Dehuroad : किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण; आठ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

Beating a young man to death for petty reasons; A case has been registered against a group of eight persons : 'रुपेश भाऊ' असे का म्हणाला नाही, या कारणावरून आरोपींनी ऋषिकेश यांना शिवीगाळ व दमदाटी केली.

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना 18 जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास किवळे येथे घडली.

ऋषिकेश किसन मोहिते (वय 21, रा. देहूरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.  या प्रकरणी त्यांनी  देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी रुपेश तावरे, योगेश माणकेश्वर आणि त्यांचे पाच ते सहा साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी ऋषिकेश आणि त्यांचा मित्र अभिषेक अवघडे हे दोघेजण भाजी घेऊन घरी जात होते. ते किवळे येथील टीसी कॉलनीमध्ये आले असता आरोपींनी त्यांना अडवले.

आरोपी रुपेश तावरे याला ‘रुपेश भाऊ’ असे का म्हणाला नाही. या कारणावरून आरोपींनी ऋषिकेश यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच लाथाबुक्या, लाकडी बांबू आणि विटाने मारहाण करून ऋषिकेश यांना जखमी केले.

देहूरोड पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.