Dehuroad : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. यामध्ये ती व्यक्ती जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री दहाच्या सुमारास पारशीचाळ, देहूरोड येथे घडली.

करण बलराज कागडा (वय 27), अर्जुन नियाराम चंडालिया (वय 32), राहुल बलराज कागडा (वय 24), अक्षय बलराज कागडा (वय 24, सर्व रा. पारशीचाळ, देहूरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सुनील उचप्पा दुबन्ना (वय 34, रा. पारशीचाळ, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री फिर्यादी यांचा भाचा रोहित याच्यासोबत आरोपींचे भांडण सुरू होते. त्यामुळे फिर्यादी सुनील हे ते भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच आरोपी करण याने सुनील यांच्या डोक्यात दगड मारला. यामध्ये सुनील गंभीर जखमी झाले.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.