Dehuroad : पूर्ववैमनस्यातून एकाला जबर मारहाण

एमपीसी न्यूज- पूर्ववैमनस्यातून एकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मंगळवारी (दि.23) दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

संजय शांताराम माळी (वय-43 रा. शेलारवाडी, मावळ) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी काचकर व त्याचे वडील (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी यांच्यात पूर्वीचे वाद होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपी मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादीच्या घरी आले. त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये माळी हे जखमी झाले असून देहूरोड पोलीस धिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.