Dehuroad : पूर्ववैमनस्यातून जावयाला मारहाण; सासरा आणि मेहुण्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून सासरा आणि मेहुण्याने जावयाच्या घरी जाऊन त्याला लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण केली. ही घटना 16 मे रोजी रात्री देहूरोड येथे घडली.

अलगेशन पेरीयस्वामी हरिजन (वय 38, रा. मदिना मस्जिद शेजारी, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कलियन पेरमल (वय 60) आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मे रोजी रात्री आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. फिर्यादी हे आरोपी कलियन यांचे जावई आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी सासरे आणि मेहुण्याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण करून जखमी केले.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.