Chinchwad Crime News : देहूरोड, भोसरी एमआयडीसी, चाकणमध्ये चोरीच्या चार घटना; पावणे आठ लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – देहूरोड, भोसरी एमआयडीसी आणि चाकण पोलीस ठाण्यात चोरीचे चार गुन्हे मंगळवारी (दि. 12) दाखल झाले आहेत. या घटनांमध्ये तब्बल पावणे आठ लाखांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे.

दिलीप शेशन्ना बोया (वय 38, रा. देहूरोड) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शितलानगर, देहूरोड येथे मंगळवारी (दि. 12) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून 18 ग्रॅम सोन्याचे दागिने व 20 हजार रुपयांची रोकड, असा एकूण 75 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला असून याप्रकरणी देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

तुमाराम निवृत्ती गाजरे (वय 47, रा. नऱ्हेरोड, धायरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी येथे फिर्यादी यांचे पवना इंडस्ट्रज शेजारी हिलटाफ असोसिएट नावाचे वर्कशॉप आहे. तेथील मैदानात शिवशाही बस व कामगारांची वाहतूक करणाऱ्या बस पार्क केल्या होत्या. चोरट्यांनी गाड्यांमधील सहा लाख 18 हजार 600 रुपये किमतीचे टीव्ही, बॅटरी, बॅटरीची केबल, अँप्लिफायर, इनव्हर्टर, जॅक, टॉमी, व्हीलपाना व वायरिंग हारनेस वस्तू चोरून नेल्या. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

रफिक्कबर अहमद नुरअकबर पिरजादे (वय 62, रा. निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 75 हजार रुपये किमतीची कार रविवारी (दि. 10) सायंकाळी पाचच्या सुमारास घराजवळ पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती कार चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार सोमवारी (दि. 11) रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

नामदेव रावजी करंडे (वय 32, रा. पाईट, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी तीन एचपी पॉवरची शेती मोटर पाईट येथील तलावाजवळ लावली आहे. शनिवारी (दि. 9) सकाळी दहा ते सोमवारी (दि. 11) सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची 10 हजार रुपये किमतीची मोटर चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.