Dehuroad : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी भाजपचे रघुवीर शेलार बिनविरोध

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी भाजपचे रघुवीर शेलार यांची काल (सोमवारी) बिनविरोध निवड झाली.

पक्षाने नेमून दिलेला एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे यांनी सोमवारी संध्याकाळी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. भाजपने वॉर्ड क्र.एकचे बोर्ड सदस्य रघुवीर शेलार यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी निश्चित केले. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत शेलार यांची नियुक्ती करण्यात आली.

बोर्डाची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर भाजपने अ‍ॅड. अरुणा पिंजण, सारिका नाईकनवरे, विशाल खंडेलवाल व ललित बालघरे यांना प्रत्येकी एक वर्षासाठी उपाध्यक्षपदाची संधी दिली होती. पक्षाच्या आदेशानुसार आता शेलार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

त्यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप काकडे, माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर तसेच भास्करराव म्हाळसकर, शांताराम कदम, अर्जुन पाठारे, एकनाथ पोटफोडे, अनंता कुडे, राजेश मुऱ्हे, रवींद्र मुऱ्हे, बोर्ड सदस्य व काँग्रेसचे शहराध्यक्ष हजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, अ‍ॅड. कैलास पानसरे, सुशीला नरवाल, मदन सोनिगरा, अशोक शेलार, गुरुमितसिंग, अंजनी बतल, बाळासाहेब शेलार, बाळासाहेब झेंडे, अमोल नाईकनवरे, रोहन गायकवाड, बिट्टू लांघे, संदेश भेगडे, अमित भेगडे, अशोक थोरात, उमाशंकर सिंह, जोगिंदर डुमडे, सूर्यकांत सुर्वे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.