Dehuroad : देहुरोड येथे चार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – देहुरोड येथे घराचा कडी-कोयंडा (Dehuroad) तोडत 4 लाख 20 हजार रुपयांची घरफोडी करण्यात आली आहे. हा प्रकार 18 ते 21 मार्च दरम्यान घडला.
याप्रकऱणी लक्ष्मीप्रसाद सुकईप्रसाद कुशवाहा (वय 62, रा.देहुराड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pimple Saudagar : दुकानाच्या जागेसाठी पत्नी व मेहुण्याकडून बेदम मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन चोरट्यांनी फिर्यादी (Dehuroad) यांच्या घराचा कडी-कोंयडा तोडून घरात प्रवेश केला व घराच्या बेडरुम मधून 4 लाख 20 हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. याचा पुढील तपास देहुरोड पोलीस करत आहेत.