Dehuroad Cantonment Board : कॅन्टोन्मेंट हद्दीतील रुग्णवाढीला ब्रेक; आज केवळ दोन रुग्णांची नोंद; 9 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : गेल्या  काही दिवसांपासून कॅन्टोन्मेंट हद्दीत कोरोना बाधित रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, शुक्रवारी किन्हई आणि संकल्पनगरी येथे प्रत्येकी एक अशा दोन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर कोरोनामुक्त झालेल्या 9 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1222 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

कोरोनातून बरे झालेल्या 9 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण 1133 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 32 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 12 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या 55 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी  11 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 34 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.