Dehuroad Cantonment News : देहूरोडकरांना खुशखबर !; कॅंटोन्मेंटचे ‘सीईओ’ कोरोनामुक्त

एमपीसीन्यूज : देहूरोड शहरातील आणि कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामवरूप हरितवाल यांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. 14 दिवसांच्या ‘आयसोलेशसन’चे उपचार घेऊन त्यांनी कोरोनावर मात मिळवली आहे. ते आजपासून ( सोमवार) पुन्हा देहूरोडकरांच्या सेवेत रुजू झाले आहेत.

देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे सीईओ हरितवाल यांना तारखेला 19 नोव्हेंबरला तापाची लक्षणे दिसून आले आली.  तपासणीअंती ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर गेली 14  दिवस ते आयसोलेशसनमध्ये उपचार घेत होते. अखेर त्यांनी कोरोनावर विजय मिळवला.

‘सीईओ’ हरितवाल आजपासून ( सोमवार) सेवेत पुन्हा रुजू झाले आहेत. आजपर्यंत देहूरोडच्या जनतेने कोरोनाच्या लढाईत कॅंटोन्मेंट प्रशासनाला उत्तम साथ दिली. देहूरोडकरांचे आशीर्वाद मिळाल्यानेच मी कोरोनावर मात करू शकलो. बोर्डाच्या सर्व सदस्य आणि अधिकारी व कर्मचारी यांच्या शुभकामना माझ्या मागे होत्या. त्यामुळेच मी कोरोनाला हरवून पुन्हा सेवेत रुजू झालो आहे, अशा भावना सीईओ हरितवाल यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोरोना हा जीवघेणा आजार आहे. त्याला कुणीही सोपा आजार समजू नये. प्रत्येकाने कोरोना आजाराबाबत शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करावे. सॅनिटायझरचा कायम वापर करावा, असे आवाहन सीईओ हरितवाल यांनी देहूरोडच्या जनतेला केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.