Dehuroad Cantonment Update : सक्रिय रुग्णांची संख्या 50 च्या आत; 8 जणांना डिस्चार्ज

0

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीत आज, शुक्रवारी ( दि.11 ) शेलारवाडी येथे एका नव्या कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली. तर कोरोनातून बरे झालेल्या 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 45 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने मंगळवारी ( दि.08 ) सायंकाळी सहा वाजता कोरोना अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

या अहवालानुसार  आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 2820 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 706 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हद्दीत आजवर 69 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 45 सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी सध्या 11 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर, 26 रुग्ण होम आयसोलेट आहेत.  8 रुग्णांवर महात्मा गांधी स्कूलमधील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment