Dehuroad : गुटखा, तंबाखू, हुक्का फ्लेवर विकणाऱ्या टपरी चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गुटखा, तंबाखू, हुक्का फ्लेवर विकणाऱ्या (Dehuroad) टपरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाई मध्ये एक लाख सहा हजार रुपयांचा गुटखा, तंबाखू, हुक्का फ्लेवर आणि सिगारेटची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि. 30) सकाळी नऊ वाजता तळवडे येथे करण्यात आली.

 

Nigdi : बस प्रवासात महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

 

महेंद्र मनोहर भगरिया (वय 26, रा. देहूगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या टपरी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई कपिलेश इगवे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे रोड तळवडे येथे एका टपरीमध्ये बेकायदेशीरपणे गुटखा, तंबाखू विक्री होत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाला, देशी-विदेशी कंपनीच्या वेगवेगळ्या फ्लेवरचा तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर व वैधानिक इशारा नसलेले सिगारेट पाकिटे असा एक लाख सहा हजार 945 रुपयांचा ऐवज त्याचबरोबर दहा हजार रुपये (Dehuroad) किमतीचा एक मोबाईल फोन जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.