Dehuroad : साडेपाच लाखांची अफरातफर करून कॅशियर फरार

एमपीसी न्यूज – कंपनीत कॅशियर म्हणून काम करत असताना 5 लाख 58 हजार 414 रुपयांची अफरातफर केली. यानंतर कॅशियर पळून गेला. ही घटना 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत तळवडे येथे घडली.

याप्रकरणी राजीव कमलेश गणेरीवाला (वय 46, रा. घोरपडी, पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रामनिवास जगमालसिंह पुनिया (वय 35, रा. व्हिपीओ कलरी, ता. राजगढ, जि. चिरू, राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजीव यांची तळवडे येथे सेफ अँड सिक्युअर लॉजिस्टिक प्रा. लि. ही कंपनी आहे. या कंपनीत आरोपी रामनिवास हा कॅशियर म्हणून काम करत होता. त्याने 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत कंपनीमध्ये आर्थिक व्यवहारांची अफरातफर करून टप्प्याटप्प्याने तब्बल 5 लाख 58 हजार 414 रुपये काढले.

त्यानंतर कंपनीला कोणतीही माहिती न देता आरोपी पळून गेला. याबाबत माहिती मिळताच राजीव यांनी देहूरोड पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.