Dehuroad : सेंट्रल ऑर्डनन्स डेपो स्थलांतर संदर्भात संरक्षण मंत्रालयाशी चर्चा करणार; शरद पवार यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज- देहूरोड येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपो मुंबईत स्थलांतरित होऊ नये या मागणीसाठी सी ओ डी वर्कर्स यूनियन आणि सी ओ डी बहुजन कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. या बाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन पूर्ण माहिती घेईन. कामगारांनी घाबरून जाऊ नये असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. हा डेपो स्थलांतरित केल्यास कामगारांची मोठी गैरसोय होणार असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हा डेपो स्थलांतरित केला जाऊ नये यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी करणारे निवेदन शरद पवार यांना देण्यात आले.

या बाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन पूर्ण माहिती घेईन. कामगारांनी घाबरून जाऊ नये असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.
यावेळी सी ओ डी वर्कर्स यूनियन आणि सी ओ डी बहुजन कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी चंदन आल्हाट, जनरल सेक्रेटरी संदीप गायकवाड, जे सी एम बाळासाहेब चव्हाण, वर्क्स कमिटी सेक्रेटरी हिरामण बालघरे आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे आपल्या लेटरहेडवर सेंट्रल ऑर्डनन्स डेपो स्थलांतरित करु नये असे पत्र प्रधानमंत्री कार्यालय आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिले. तसेच दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी या विषयावर चर्चा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.