Dehuroad : देहूरोड बौद्ध विहार कार्यक्रमानिमित्त वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – देहूरोड येथील ऐतिहासिक बौद्ध विहार येथे होणा-या कार्यक्रमानिमित्त बुधवारी (दि. 25) देहूरोड परिसरातील वाहतूक वळविण्यात आली आहे. हा बदल सकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत असणार आहे. याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत.

देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमी (बौद्ध विहार) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1954 साली स्वतः भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. यानिमित्त दरवर्षी या धम्मभूमीत 25 डिसेंबर रोजी बौद्ध अनुयायी आणि बांधव एकत्र येतात. त्या पार्श्वभूमीवर देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

* जुना मुंबई-पुणे महामार्गावरून सोमाटणेकडून निगडीकडे येणा-या वाहनांना सेंट्रल चौकातून पुढे जाण्यास मनाई आहे. त्यासाठी सेंट्रल चौकातून उजवीकडे वळून मुंबई-बेंगलोर महामार्गावरून इच्छित स्थळी जात येणार आहे.

* पिंपरीकडून देहूरोडमार्गे मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक भक्ती शक्ती चौकात बंद केली आहे. यासाठी पर्यायी मार्ग – भक्ती शक्ती चौकातून डावीकडे वळून रावेतमार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.