Dehuroad Crime News : देहूरोड, चिखलीत तीन घरफोड्या; निगडीतून दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – देहूरोड परिसरात दोन तर चिखली परिसरात एक घरफोडी झाली तर निगडीत घरातून दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दि. 11) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चारही घटनांमध्ये एकूण सात लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.

रामलाल वैनारामजी चौधरी (वय 36, रा. मुकाई चौक जवळ, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चौधरी यांच्या किराणा दुकानाचा पत्रा उचकटून दुकानातून रोख रक्कम, एलईडी टीव्ही, मोबाईल फोन असा एकूण 39 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 1 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा ते 2 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

बालाजी शेषेराव रोठुडे (वय 45, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम पॉलिकॅब कंपनीची वायर, बटनचा बॉक्स असा एकूण 11 हजार 965 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 14 ऑक्टोबर रोजी सकाळी रावेत गावठाण येथे उघडकीस आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

सचिन गजानन लोखंडे (वय 38, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी आणि त्यांचे चुलते रमेश बबन लोखंडे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 12 तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण चार लाख 88 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 10) दुपारी पाच ते रात्री अकरा वाजताच्या कालावधीत घडला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

निगडी पोलीस ठाण्यात श्रीकांत सदाशिव कुंभार (वय 32, रा. आकुर्डी) यांनी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरातून एक लाख 62 हजारांचे 39.110 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी दहा ते दुपारी बारा वाजताच्या कालावधीत घडली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.