Dehuroad : स्वच्छ सुंदर व हरित देहूरोड; भक्ती-शक्ती चौक ते देहूगांव फाट्यापर्यंतचा मार्ग करणार चकाचक

एमपीसी न्यूज – ‘स्वच्छ, सुंदर व हरित देहूरोड’ असे ( Dehuroad) ब्रिदवाक्य घेऊन देहूरोड व पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण प्रेमी नागरिक व संस्थांनी स्वच्छता अभियान सुरु केले. जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरील जकात नाक्यापासून अभियानाला सुरुवात करण्यात आली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी भक्ती-शक्ती चौक ते देहूगांव फाटा या रस्त्याच्या दुतर्फा साफसफाई पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला.

मेजर विनीत कुमार, कर्नल प्रियांक चौधरी, आयुध निर्माण कंपनी, देहुरोडचे व्यवस्थापक संजीव गुप्ता, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे भास्कर रिकामे, देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे प्रशासक अॅड. कैलास पानसरे, देहूरोड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.महेश कुदळे, डॉ रमेश बंसल यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरवात करण्यात आली.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी भक्ती-शक्ती चौक ते देहूगांव फाटा या रस्त्याच्या दुतर्फा साफसफाई पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते आठ या वेळेत हे अभियान चालणार आहे. तर दैनंदिन सफाई देखील सुरु राहणार आहे. या अभियानांतर्गत हा रस्ता व देहूरोड परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न व त्याबरोबरच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व पर्यावरणपुरक उपक्रम राबविण्यात येतील.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 13 गाड्या एकमेकांवर आदळल्या

या अभियानात 29FAD चे जवान, देहुरोड कँन्टोमेंटचे आरोग्य विभागाचे सेवक, देहूरोड डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. श्रीनिवास बंसल, डॉ. विजय चौधरी, डॉ. राजेंद्र चावत, डॉ. जयेश कदम, डॉ. सुभाष जाधवर, डॉ. प्रकाश जाधवर, डॉ. किशोर नाईकरे, डॉ. मंजुषा सावंत, ॲड सावंत, पर्यावरण गतिविधीचे सागर नाझरकर, यांनी श्रमदान केले.

निसर्गमित्र मनेश म्हस्के, विजय सावंत, सुनील गुरव, सपारिया, बाळासाहेब ( Dehuroad) सातपुते, दिपक पंडित, राजेश देशमुख, जर्नलसिंग सैनी, स्वप्निल भालेकर यांचेसह सुमारे ऐंशी जणांनी सहभाग घेतला. येत्या रविवारी सकाळी सहा ते आठ OFDR गेट क्रमांक एक (पेट्रोल पंप जवळ) येथून स्वच्छता अभियान व प्लास्टिक संकलन सुरु करण्यात येईल. यामध्ये जास्तीत जास्त संस्था व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. रमेश बन्सल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.