Dehuroad: कॉलेजमधील भांडणातून टोळक्याची तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – कॉलेजमध्ये झालेल्या भांडणातून सात जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.7) दुपारी एक वाजता आकुर्डीत घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

प्रतीक राम डोके (वय 19), अभिजित उर्फ गणेश अशोक पुरी (वय 19, दोघे रा. निगडी), वरुण वसंत नागरे (वय 20 रा, म्हेत्रेवस्ती, चिखली) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांचे साथीदार पसार आहेत. याबाबत शुभम अशोक इंगवले (रा. शाहुनगर, चिंचवड)याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि आरोपींची पूर्वी कॉलेजमध्ये भांडणे झाली होती. त्यातून त्यांच्यात वैमनस्य होते. गुरुवारी शुभम मित्रांसोबत आकुर्डी येथील एका कॅफेसमोर गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी कॉलेजमधील भांडणाच्या कारणावरुन त्याच्या डोक्यात, उजव्या हातावर, दोन्ही पायाच्या नडगीवर बेदम मारहाण केली. देहूरोड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.