Dehuroad : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने वाहन प्रवेश शुल्क वसुलीला प्रारंभ

Commencement of recovery of vehicle entry fee on behalf of Dehuroad Cantonment Board

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने आजपासून ( मंगळवारी ) बोर्डाचे उपाध्यक्ष रघुविर शेलार, मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वाहन प्रवेश शुल्क वसुलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी वाहनचालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल म्हणाले, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त वाहन शुल्क वसुली करावी. त्यामुळे बोर्डाच्या उत्पन्नात वाढ होईल व बोर्डातील आर्थिक तूट भरून निघण्यास मदत होईल.

सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व नाक्यांवर प्रत्येक शिफ्टमध्ये दोन-दोन कामगार काम करतील. आवश्यकतेप्रमाणे पुढील काळात त्यामध्ये वाढ करण्यात येईल.

बोर्डाचे उपाध्यक्ष शेलार यांनी सर्व कामगार व स्टाप यांना करोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी सर्व नियमांचे पालन करून वाहन शुल्क वसुली करण्याच्या सूचना दिल्या तसेच सर्व नाक्यांवर हँड सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहनही केले.

नगरसेवक हाजीमलंग मारीमत्तू, गोपाळ तंतरपाळे, कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत, महसूल विभागप्रमुख नंदकुमार करंजावणे, विक्रम जाधव, राहुल साळुंके, श्रीकृष्ण देशमुख, तसेच अमोल नाईकनवरे व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.