Dehuroad : कंपनीचा माल आणि टेम्पोसकट साडे चार लाखांच्या ऐवजासह चालक पसार

एमपीसी न्यूज – कंपनीचे शिट मेटल व कंपनीत लावलेला टेम्पो घेऊन (Dehuroad) टेम्पो चालक पसार झाला आहे. ही घटना तळवडे येथील फिझित्सो कंपनी येथे घडला आहे.

या प्रकरणी तानाजी सोमजी करपे (वय 49, रा.कुरुळी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सचिन त्रिपाठी व विजयकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ट्रान्सपोर्टचा धंदा आहे. फिर्यादीनुसार आरोपी सचिन गाडीवर कामाला आहे. गाडीमधून रविवारी (दि.26) श्री करवीर इंडस्ट्री येथून एम.एस.सिटी मेटल फिर्यादीच्या गाडीमध्ये लोड करून ते चाकण येथील रीलायबल ऑटो येथे पाठवायचे होते. मात्र आरोपीने ते न पोहचवता ओळखीच्या (Dehuroad) दशरथ गराडे यांच्या गाडीमध्ये लोड करत फिर्यादी व दशरथ गराडे यांचा ड्रायव्हर दोघे पळून गेले आहेत.

त्यांनी दीड लाखांचा टेम्पो व 3 लाख 2 हजार 345 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यावरून देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Dighi : कचराकुंडी साफ केली नाही म्हणून तरुणाला मारहाण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.