BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : महार वतनाची जमीन हडपल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – महार वतनाची जमीन हडपल्याप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या आदेशानंतर दोन बांधकाम व्यावसायिकांसह 27 जणांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर अंकुश जाधव (वय 43, रा. जाधवनगर, रावेत) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुरूमुख सुखवानी आणि घनश्याम अगरवाल (रा. पिंपरी) आणि अन्य 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथे सागर यांची 40 एकर जमीन आहे. त्या जमिनीच्या भोवताली सागर यांनी कंपाउंड केले आहे. बांधकाम व्यावसायिक सुखवानी आणि अगरवाल यांनी 2013 साली सागर यांच्या जागेवर अतिक्रमण केले. सागर यांनी याप्रकरणी अनुसूचित जणी जमाती आयोगाकडे याबाबत तक्रार केली. हा वाद न्यायालयात सुरु असताना 2 मार्च रोजी बांधकाम व्यावसायिकांच्या गुंडांनी सागर यांच्या जमिनीवर असलेली झोपडी पाडून वॉचमनला मारहाण केली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.