_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Dehuroad : इंधनदरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

Congress protests against fuel price hike :इंधनदरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

एमपीसीन्यूज : डिझेल आणि पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ देहूरोड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज, गुरुवारी मेन बाजारपेठेतील सुभाष चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. त्यानंतर मोर्चा काढून तलाठी शांता बाणखेले यांना निवेदन देण्यात आले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू आणि नगरसेवक गोपाळ तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

काँग्रेसचे मोहन राऊत, दीपक सायसर, लक्ष्मण ढिल्लोड, सुखदेव निकाळजे, गफूरभाई शेख, महेश गायकवाड ज्योती वैरागर, राणी पांडियन, नसीम मणियार, गीता रामनारायण यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश आणि पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने तातडीने इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.