Dehuroad : गृहनिर्माण संस्थांमध्ये कोरोनाचा शिरकाव; आज २२ नवीन रुग्णांची नोंद

आजपर्यंत हद्दीत एकूण 468 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले. ; Corona infiltration into housing institutions; Today 22 new patients were registered

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील मेन बाजार, बरलोटा नगर (ममता बिल्डिंग, मोहित बिल्डिंग ), आंबेडकर नगर, मेहता पार्क, मामुर्डी, संकल्प नगरी, स्वप्ननगरी या परिसरात आज, शुक्रवारी एका दिवसात 22 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

आजपर्यंत हद्दीत एकूण 468 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 22 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे.

रुग्णवाढीचे प्रमाण झोपडपट्टी भाग, गृहनिर्माण संस्था आणि बाजारपेठेत आढळून येत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 468 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 39 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

135 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 27 रुग्ण उपचार घेत आहे.  हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 13 इतकी आहे.

दरम्यान,  आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 254 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.