Dehuroad Corona News : कॅंटोन्मेंटच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरु

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना देहूरोड शहरात लसीकरणाची सोया उपलब्ध झाली आहे.

कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्याहस्ते बुधवारी ( दि. 24) या लसीकरण केंद्राचे उदघाटन झाले. पहिली लस रुग्णवाहिका चालक किशोर चंडालिया यांना देण्यात आली.

यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास चाटे, औषध निर्माण अधिकारी पी. के. वेळापुरे, बहुउद्देशीय आरोग्य सेवक श्रीधर जाधव, परिचारिका जयश्री भोरे, प्रभा कोकाटे आदी उपस्थित होते.

या लसीकरण केंद्रात 60 वर्षांपुढील जेष्ठ नागरिक, 45 ते 59  वयोगातील सहव्याधी असलेल्या नागरिकांचे तसेच आरोग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर लसीकरण करण्यात येत आहे. बुधवारी पहिल्या दिवशी 90 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

या केंद्रासाठी पहिल्या टप्प्यात कोव्हीशील्ड लसीचे 500 डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांनी लसीकरणासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी केले आहे.

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीत कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाने पुणे जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला होता. तसेच भारतीय जनता पक्षाचे देहूरोड  शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार,  तुकाराम जाधव यांच्यासह माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनीही कॅंटोन्मेंट हद्दीत लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.