Dehuroad : कोरोना रुग्णांनी ओलांडला 200चा आकडा; आज 24 रुग्णांची भर

Dehuroad Corona Update today 24 New Corona positive patients

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पारशी चाळ, थॉमस कॉलनी, शगुन सोसायटी, चिंचोली, गांधीनगर, बरलोटानगर,  शिवाजीनगर या परिसरात आज, गुरुवारी एकूण 24 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

त्यामुळे आजपर्यंत हद्दीत एकूण 210 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, गांधीनगर येथील कोरोनाबाधित महिलेचा पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, गुरुवारी रात्री दहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज 24 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. रुग्णवाढीचे प्रमाण झोपडपट्टी परिसर जास्त असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

कोरोनातून बरे झालेल्या तीन रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. तर एका महिला कोरोनाबाधित महिलेचा वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 210 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

यापैकी सध्या 29 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, 42 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 65 रुग्ण उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 69  रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, फक्त कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.