-MPC-TOP-MOST-BANNER-I

Dehuroad News : ट्रेड लायसन्स नूतनीकरणासाठी कोरोना चाचणी बंधनकारक करा -अश्रफ आतार

यासंदर्भात आतार यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांना निवेदन दिले आहे. : Corona test mandatory for trade license renewal'

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज  : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ट्रेड लायसन्स नूतनीकरासाठी वैद्यकीय तपासणीसह कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अश्रफ आतार यांनी केली आहे.

यासंदर्भात आतार यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांना निवेदन दिले आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने ट्रेड लायसन्स नूतनीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीतील छोटे व्यावसायिक व व्यापारी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करीत आहेत.

सध्या शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेड लायसन्स नूतनीकरणासाठी चाचणी करणे बंधनकारक करावे.

कोरोना चाचणी अहवाल सादर केल्यानंतरच संबंधीतांच्या ट्रेड लायसन्स नूतनीकरण करावे, असे आतार यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.