Dehuroad Corona Upadate : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; किन्हईत 10 रुग्ण आढळले

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, बुधवारी किन्हई येथे सर्वाधिक 10 रुग्णांची आज नोंद झाली. तर झेंडेमळा आणि मेन बाजार येथे 2 आणि दत्तनगर, श्रीकृष्ण नगर, वृंदावन सोसायटी, विक्रांत अपार्टमेंट, सिद्धीविनायक नगरी, गांधीनगर येथे प्रत्येकी एका अशा एकूण 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

किन्हई येथील 10 रुग्णांपैकी 7 रुग्ण हे ‘माझे कुटुंब माझी जाबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत केलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1113 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, बुधवारी रात्री  साडे आठ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 20 नवीन रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 1113 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आज एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. तर आजपर्यंत एकूण 974 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 110 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी सध्या 11 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 32 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. होम आयसोलेशनमध्ये 67 रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 29 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.