Dehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 10 कोरोना पॉझिटिव्ह; 28 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीतील श्रीकृष्ण नगर, चिंचोली, गांधीनगर, आंबेडकरनगर, थॉमस कॉलनी (लायन्स क्लब स्कूल मागे ), झेंडे मळा येथे  आज, शुक्रवारी 10 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.  तर आज, उपचार पूर्ण होऊन बरे झालेल्या 28 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत हद्दीत एकूण 690 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 10 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 690 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 37 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 35 रुग्णांना, हिंजवडी येथील विप्रो कोविड केअर सेंटर येथे ३ रुग्ण, तर एका रुग्णाला तळेगाव दाभाडे येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

89 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आज 28 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 506 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 19 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.