Dehuroad Corona Update : कॅंटोन्मेंट हद्दीत आज 10 रुग्णांची नोंद; एकाच कुटुंबातील 9 जण पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात घट होत असताना आज तब्बल दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामध्ये बरलोटा नगर येथील एका, तर मेन बाजार येथील एकाच कुटुंबातील ९ जणांचा समावेश असल्याची माहिती कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून देण्यात आली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, गुरुवारी दुपारी साडेचार वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1308 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आजपर्यंत एकूण 1254 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 3 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 9 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर हद्दीत 19 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 7 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 35 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.