Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 11 नवे रुग्ण ; 5 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत आज, सोमवारी 11 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, बरे झालेल्या 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सध्या 112 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने मंगळवारी (दि.25) सायंकाळी सात वाजता कोरोना अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

या अहवालानुसार  शिवाजीनगर येथील एका 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. 23 मेला हा मृत्यू झाल्याची नोंद  असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 2723 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 544 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हद्दीत आजवर 67 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 112 सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी सध्या 20 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर, 55 रुग्ण होम आयसोलेट आहेत तर, 37 रुग्णांवर महात्मा गांधी स्कूलमधील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

आज आढळलेले नवीन रुग्ण

गांधी नगर (1), मेन बाजार (1), इंद्रलोक बिल्डिंग (1), शीतलानगर नं/ 1(3), चिंचोली (2), किन्हई (1), थॉमस कॉलनी (1), इंद्रपूरम सोसायटी (1).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.