Dehuroad Corona Update : कॅंटोन्मेंट हद्दीत 14 ॲक्टिव्ह रुग्ण; कोरोनामुक्त एका रुग्णाला डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात घट होत आहे.   आज, गुरुवारी सुद्धा कोरोना रुग्णवाढीला पुन्हा ब्रेक मिळाला. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होऊ शकली, तर कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याचे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज,गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. या अहवालानुसार, आज एकाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झालेली नाही.

तर आजपर्यंत हद्दीत एकूण 1295 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच एकूण 1246 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 6 असून, महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये अवघे 3 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर हद्दीत 14 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 5 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 35 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.