Dehuroad Corona Update : कॅंटोन्मेंट हद्दीत आज 14 जणांना डिस्चार्ज; 4 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीत आज, बुधवारी ( दि.09 ) 4 नव्या कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली. तर कोरोनातून बरे झालेल्या 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 58 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने बुधवारी ( दि.09 ) सायंकाळी सहा वाजता कोरोना अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

या अहवालानुसार  आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 2819 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 692 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हद्दीत आजवर 69 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 58 सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी सध्या 17 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर, 26 रुग्ण होम आयसोलेट आहेत.  15 रुग्णांवर महात्मा गांधी स्कूलमधील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

आज आढळून आलेले रुग्ण

चिंचोली (1), बरलोटानगर (1), आंबेडकर नगर (1), किन्हई (1).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.