Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 15 नवीन रुग्णांची नोंद; 6 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीत श्रीकृष्ण नगर व मेन बाजार येथे प्रत्येकी 4, चिंचोली आणि थॉमस कॉलनी येथे प्रत्येकी 2, तर शितलानगर नं. 1, आंबेडकर नगर आणि संकल्प नगरी येथे प्रत्येकी 1 अशा एकूण 15 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आज, बुधवारी नोंद झाली.

तर कोरोनावर यशस्वी मात केलेल्या 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कॅण्टोन्मेट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आजपर्यंत हद्दीत एकूण 932 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 15 नवीन रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 932 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आज,6 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 793 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 113 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

यापैकी सध्या 15 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 52 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये कॅन्टोन्मेंट हद्दीतील 34 आणि हद्दीबाहेरील 18 रुग्णांचा समावेश आहे. तर 2 रुग्णावर मोशी कोविड सेंटरमध्ये आणि एका रुग्णावर नेहरूनगर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

61 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 26 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.