Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 19  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; दोघांना डिस्चार्ज

एकट्या शेलारवाडी येथे एकूण 5 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली.

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीत एलआयजी क्वार्टर, चिंचोली, संकल्प नगरी, कुंडमळा या भागात प्रत्येकी दोन, थॉमस कॉलनी येथे 3  तर पोलीस लाईन, गांधीनगर आणि किन्हई येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. दरम्यान, एकट्या शेलारवाडी येथे एकूण 5 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एका दिवसात कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 19  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची माहिती कॅण्टोन्मेट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

आजपर्यंत हद्दीत एकूण 881  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शनिवार सायंकाळी सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत फक्त 19  नवीन रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 881  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आज, 2  रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 709 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

यापैकी सध्या 17 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 28 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये कॅन्टोन्मेंट हद्दीतील 22 आणि हद्दीबाहेरील 6  रुग्णांचा समावेश आहे.

108  रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, थॉमस कॉलनी येथील 58  वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे 29 ऑगस्ट रोजी मृत्यू झाल्याची माहिती आज, शनिवारी मिळाली. त्यामुळे हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 25 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.