Dehuroad Corona Update : कॅन्टोमेंट हद्दीत आज 19 पॉझिटिव्ह रुग्ण; 6 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, शनिवारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत एकूण 195 रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यात 16  रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. तर अन्य भागात मिळून एकूण 19  नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोनातून बरे झालेल्या 6 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1149 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शनिवारी रात्री साडे आठ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज “माझे कुटुंब माझी जाबाबदारी ” या मोहिमे अंतर्गत शेलारवाडी, शेलारमळा, कोटेश्वरवाडी,  झेंडेमळा, संकल्प नगरी,  श्रीकृष्ण नगर येथे तपासणी करण्यात आली. यात एकूण 195 रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या.

यामध्ये 16 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. शेलारवाडी – 0, शेलारमळा -09, कोटेश्वरवाडी -0, झेंडे मळा -01, श्रीकृष्ण नगर – 03, संकल्पनगरी – 0, मामुर्डी -02, विकासनगर -01 अशी या चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची आकडेवारी आहे. याशिवाय गांधी नगर, मेन बाजार येथे मिळून एकूण 19  रुग्णांची नोंद झाली.

आज 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आजपर्यंत एकूण 1024 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 95 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी   9 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 46 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. होम आयसोलेशनमध्ये 40 रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 30 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.