Dehuroad Corona Update : देहूरोडमध्ये 203 सक्रिय रुग्ण; आज 24 नवे रुग्ण, 5 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज गुरुवारी (दि.8 ) 24 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 1791 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली. 

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1791 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.  हद्दीत सध्या 203 सक्रिय रुग्ण आहेत.तर कोरोना उपचार पूर्ण झालेल्या 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 33 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आतापर्यंत एकूण 1552 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. होम आयसोलेशनमध्ये 126 रुग्ण असून हद्दीत एकूण 203 सक्रिय रुग्ण आहेत.

सीजिएच कोविड सेंटरमध्ये सध्या 41 रुग्ण दाखल आहेत. पीसीएमसी कोविड सेंटर येथे 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत हद्दीत एकूण 36 मृत्यूंची नोंद झाली आहे.

आज आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे

श्रीविहार (1), किन्हई (2), झेंडे मळा (3), मेन बाजार- अंबिका ड्रायविंग स्कूल परिसर (3) एल्लोरा सोसायटी (1), शितळानगर नं. 2-साई अपार्टमेंट (1)शितळानगर नं. 1(1), लक्ष्मी पुरम (1), चिंचोली (2), इंद्रपूरम A(1), बरलोटा नगर (2), दत्तनगर (2), इंद्रप्रस्थ (1), समर्थ नगरी (3).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.