Dehuroad Corona Update : आज 32 नवे रुग्ण; चिंचोलीत 10, लक्ष्मी पुरम येथे 9 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत मंगळवारी (दि.13 ) एकूण 32 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर हद्दीत 299 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 1954 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.

कॅंटोन्मेंट हद्दीत सक्रिय रुग्णांचा आणि नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या 39  रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 1618 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

होम आयसोलेशनमध्ये 190 रुग्ण आहेत. महात्मा गांधी शाळेतील कोविड सेंटरमध्ये  67 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. पीसीएमसी कोविड सेंटर येथे 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत हद्दीत एकूण 37 मृत्यूंची नोंद झाली आहे.

मंगळवारी आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे

चिंचोली (10), लक्ष्मी पुरम (9), शेलारवाडी (3), झेंडे मळा (2), अलकापुरी (2), मेन बाजार (2), शितळानगर नं 1(1),  शिवाजी नगर (1), श्रीकृष्ण नगर (1),मामुर्डी (1).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.